रावेर बाजार समिती सभापदीपदीची उत्सुकता शिगेला !

रावेर-शालीक महाजन | आज रावेर कृषी उपन्न बाजार समितीत सभापती पदाचे नाव निश्चित करण्यासाठी आज माजी आमदार अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थित महत्वाची बैठक होणार आहे.यात राष्ट्रवादीचे सर्व संचालक उपस्थित राहणार असून या बैठकीत नवीन सभापतीच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.सभापतीपदाच्या प्रबळ दावेदारीत मंदार पाटील किंवा राजेंद्र चौधरी यांच्यात चुरस आहे.

आमदार शिरीष चौधरी व माजी आमदार अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थित महाविकास आघाडीची काल बैठक संपन्न झाली. यामध्ये कॉग्रेस राष्ट्रवादी तसेच शिवसेना (ठाकरे गट) यांची संयुक्त बैठक होऊन आगामी पाच वर्षाचा फॉर्मुला निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार सर्वात जास्त जागा राष्ट्रवादीच्या असल्याने त्यांना पहील्यांदा सभापती पदाची संधी मिळणार आहे. तर कॉग्रेस पक्षाला उपसभापती पदाची संधी मिळणार आहे.सभापती पदाच्या शर्यतीत मंदार पाटील व राजेंद्र चौधरी यांच्या पैकी एकाला सभापती होण्याचा बहुमान मिळणार आहे.आज माजी आमदार अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रवादीच्या सर्व संचालकांची बैठक होणार असुन या बैठकीतच आगामी सभापतीच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.यात सर्वात राजकीय घडामोड म्हणजे अपक्ष संचालक गणेश महाजन यांना शिवसेनेकडून उपसभापती पदाची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.

कोण आहे राजेंद्र चौधरी व मंदार पाटील ?

राजेंद्र चौधरी उर्फ़े राजू ठेकेदार माजी आमदार अरुण पाटील यांचे विश्‍वास कार्यकर्ते आहे.रावेर पंचायत समितीला राजू ठेकेदार यांच्या पत्नी रेखा चौधरी उपसभापती होत्या.आता देखिल आगामी रावेर नगर पालिकेला महाविकास आघाडी तर्फे राजेंद्र चौधरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहणार असल्याची दाट शक्यता आहे. तर मंदार पाटील हे माजी आमदार अरूणदादा पाटील यांचे पुतणे आहेत. अलीकडच्या काळात ते राजकारणात सक्रीय झाले असून त्यांना सभापतीपदाची संधी मिळणार का ? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content