जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेला अश्लिल शिवीगाळ करून विनयभंग करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी १८ मे रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४० वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १८ मे रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास महिला घरी असतांना मनोज लिलाधर वाणी याने घरासमोर येवून काहीही कारण नसतांना महिलेला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच तिच्या कालशिलात लावून अंगावरील कपडे फाडून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी मनोज वाणी याच्या विरोधात दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पेालीस नाईक भारती देशमुख करीत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.