जि.प.पं.स. सदस्यांच्या विविध मागण्या शासन स्तरावर पोहोचविण्याबाबत निवेदन

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढविण्यात यावा, यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोशिएशन तर्फे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात प्रथमच जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्य यांची सर्व पक्ष संघटना स्थापन झाली आहे ग्रामीण भागातील जवळपास 40 ते 45 हजार जनतेसमोर समाजसेवा करत आहोत समाजसेवा करताना शासन कडून महत्त्वाच्या गोष्टींचा आमच्यावर अन्याय होत असतो त्यामुळे बऱ्याच तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते ग्रामीण भागाच्या हितासाठी व सदस्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना कार्यरत आहे शासनाकडील राबविण्यात येणाऱ्या निधीची व योजनांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा जिल्हा परिषद व पंचायत समिती आहे या वास्तव आमच्या महत्त्वाच्या मागण्या व अडचणी शासनाच्या निर्दशनास आणून द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.

मागण्या पुढील प्रमाणे – 

१. स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा मतदार असावा

२. कोविड-१९ गेल्या दीड वर्षापासून मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची योजना प्राधान्याने राबविण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे पदाधिकारी यांचा संपर्क ग्रामीण जनतेचे होऊ शकला ३. नसल्याने जि प पं स कार्यकाळ एक वर्षाकरता मुदतवाढ मिळावी

४. जि.प.पं.स सदस्यांचे रात राजकीय आरक्षण कमी दहा वर्षांसाठी किमान असावे

५. जि.प.पं.स मध्ये कुशल क्राफ्ट सदस्यांची नियुक्ती करावी

६. ७३.७४ वी घटनादुरुस्ती पूर्णपणे राज्यात लागू करावी

७. पूर्वीप्रमाणे असणारे किमान बदली अधिकारी इत्यादी मिळावेत

८.पंचायत समिती सदस्य यांना विविध परिषद साठी मतदानाचा अधिकार असावा

९. जिल्हा परिषद सदस्य यांना किमान वीस हजार रुपये व पंचायत समिती सदस्यांना किमान दहा हजार रुपये असावे

अशा वरील प्रमाणे मागण्या शासन स्तरावर सादर कराव्यात अशी विनंती करण्यात आली असून या निवेदनावर जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, लालचंद पाटील, नाना महाजन, अरुण पाटील, पवन सोनवणे, कैलास सरोदे, मनोहर पाटील, गजेंद्र सोनवणे आदींनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत.

 

Protected Content