जळगाव प्रतिनिधी । अगदी आपल्या घरपोच हॉटेल्समधील खाद्यपदार्थ आणून देण्याची सेवा पुरवणार्या झोमॅटो कंपनीचे आजपासून जळगावात कार्यान्वयन सुरू झाले आहे. फुड इंडस्ट्रीत यामुळे नवीन अध्याय सुरू होणार असल्याचे मानले जात आहे.
झोमॅटो ही फुड डिलीव्हरीत अग्रेसर असणारी कंपनी आजपासून जळगावात कार्यरत झाली आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील सुमारे १२० हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ ग्राहकांना या सेवेच्या माध्यमातून आपल्या घरपोच मागविता येणार आहेत. झोमॅटोची स्वत:ची कोणतीही हॉटेल नसल्याची बाब येथे लक्षात घेणे गरजेचे आहे. मात्र जळगावातील बहुतांश ख्यातप्राप्त हॉटेलमधील खाद्यपदार्थ हे संबंधीत कंपनी ग्राहकाला अगदी घरपोच पोहचवणार आहे. यासाठी युजरला याचे अॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागणार आहे. हे अॅप आपण येथे क्लिक करून इन्स्टॉल करू शकतात.
जळगावात झोमॅटो कंपनी कार्यरत झाल्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीच्या क्षेत्रात नवीन युगाचा प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे. खरं तर जळगावात आधीच दोन फुड डिलीव्हरी कंपन्या कार्यरत होत्या. मात्र झोमॅटोसारख्या आंतराष्ट्रीय पातळीवर ख्यात असणार्या कंपनीच्या आगमनामुळे या क्षेत्रातील स्पर्धा अतिशय तीव्र होणार आहे.
पहा व्हिडीओ– झोमॅटो अॅपवरून ऑर्डर कशी द्यावी.