घोडसगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रवेशोत्सव साजरा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | १५ जून पासून नवीन शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात होऊन शाळा सुरू झाली. इयत्ता पहिलीत आतापर्यंत 35 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून त्या अनुषंगाने आज शाळेच्या पहिल्याच दिवशी येता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील माझी पहिले पाऊल या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना फेटे बांधून घोड्यावरून गावातून मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर शाळेत त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्नेह भोजन देण्यात आले. या कार्यक्रमास पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री मदनजी मोरे साहेब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलकंठ भगत,सदस्य विनोद जावरे व इतर सदस्यांसह मुख्याध्यापक अनिल पवार, शिक्षक भिका जावरे, सोमनाथ गोंडगिरे, गोपाल दुतोंडे, स्वाती भंगाळे, अंगणवाडी सेविका, मदतनीस,पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक सत्रात आतापर्यंत इयत्ता पहिली 35 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून बाहेरगावी इंग्लिश मीडियम मध्ये जाणारे बरेच विद्यार्थी पुन्हा गावात मराठी शाळेत परत आले आहे. तसेच आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांनी सुद्धा या शाळेत प्रवेश घेतला आहे. ही जिल्हा परिषद शाळांसाठी व शिक्षकांसाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. मागील वर्षी शाळेला मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार मिळाला असून यावर्षी सुध्दा शाळेचे नाव राज्यस्तरापर्यंत नेण्याचा मानस आहे.यासाठी सर्व शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी यांचे अनमोल सहकार्य लाभत असून सर्व शिक्षकांची मेहनत फळाला येत आहे.

Protected Content