वीज बिल शुन्य करा; जाणून घ्या ! प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेची संपूर्ण माहिती

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सौर ऊर्जा निर्मितीचा वापर करून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत वीज ग्राहकांना आपले वीजबिल शुन्य करता येणार आहे.योजनेत वीज ग्राहकांना सहभाग घेता यावा यासाठी महावितरणने सर्व सुविधा महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या योजनेचा लाभ घेऊन अकोला परिमंडलातील १ हजार ५३९ ग्राहकांनी घरावर सौर रुफ़ टॉप बसवून वापरा एवढी वीज निर्मिती करून आपले वीजबिल शुन्य केले आहे. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेत ग्राहकांना विज निर्माते होऊन आपले वीजबिल शुन्य करता येत असल्याने परिमंडळातील वीज ग्राहकांनी केंद्र शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केली आहे. राज्यात शासनाच्या या योजनेच्या अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणकडे देण्यात आली आहे.योजनेत सहभागी होण्यासाठी ७ हजार ६८७ ग्राहकांचे अर्ज आले असून त्यांचे काम प्रगतीपथावर आहे.

परिमंडलाअंतर्गत रूफ टॉप बसवून कार्यान्वित करण्यात आलेल्या एकुण १ हजार ५३९ ग्राहकांमध्ये अकोला जिल्ह्यातील ७३९, बुलडाणा जिल्ह्यातील ६२२ आणि वाशीम जिल्ह्यातील १७८ ग्राहकाचा समावेश आहे.परिमंडळाअंतर्गत प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या अर्जात अकोला जिल्ह्यातील २ हजार ९७२, बुलडाणा जिल्ह्यातील ३ हजार ३५३ आणि वाशीम जिल्ह्यातील १ हजार ३६२ ग्राहकांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला साठ हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला जास्तीत -जास्त ७८ हजार रुपये अनुदान मिळते.

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीजेचा आवश्यकतेएवढा वापर झाल्यानंतर अतीरिक्त निर्माण झालेली वीज महावितरणच्या ग्रीड मध्ये समाविष्ट करण्यात येते.महिन्याच्या शेवटी वीज वापर आणि निर्मिती याचा हिशेब होतो.आवश्यकतेएवढी वीज निर्मिती झाल्यामुळे ग्राहकाचे वीजबिल शुन्य होते,शिवाय अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते.

महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत संकेतस्थळावरून तसेच पीएम– सूर्यघर या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केल्यानंतर महावितरणकडून अनुशंघीक तांत्रिक प्रक्रीया पुर्ण केल्या जाते. पुढील अनुदानाची प्रक्रीया नविन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून (MNRE) पुर्ण करण्यात येत असून अनुदानाची रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केल्या जाते.

ग्राहकांच्या अर्जाला छतावरील सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या रूफ टॉप सोलर प्रकल्पांसाठी महावितरणच्या संकेतस्थळावर माहिती आणि लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सोबतच १० किलोवॅटपर्यंत पीव्ही क्षमतेच्या रूफटॉप सोलर ऍप्लिकेशन साठी आवश्यक तांत्रिक व्यवहार्यतेसाठी स्वयंचलित मान्यता (डिम्ड अप्रूवल) दिली आहे. उपयोजित सोलर पीव्ही क्षमता रूफ टॉप सोलर ग्राहकाच्या मंजुर भारापेक्षा अधिक असेल, तर अशा ग्राहकांच्या भार वाढीसाठी लागू केलेल्या पीव्ही क्षमतेपर्यंत (जास्तीत जास्त १० किलोवॅटपर्यंत) मंजूर भार वाढविण्यासाठीचा अर्ज स्वयंचलितपणे सिस्टमद्वारे तयार केला जाईल आणि त्यनुसार ग्राहकांना पैश्याचा भरणा करण्याचे सूचित केले जाईल. भार वाढीसाठी आवश्यक शुल्क भरल्यानंतर, भार वाढ आपोआप लागू होणार आहे.

Protected Content