संसर्गामुळे मृत्यूसंदर्भात मदत अनुदान अर्जासाठी २४ मे पर्यंत मुदत

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज – जिल्ह्यात कोविड संसर्गामुळे मृत्यू झालेल्या नागरिकाच्या निकटवर्तीयांना सानुग्रह अनुदान मदत देण्यात येत आहे. या मदत अनुदान अर्जासाठी विहित मुदतीनुसार अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात कोरोन संसर्गामुळे मृत्यू झालेल्याच्या निकटवर्तीयांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान मदत योजना १ डिसेंबर २०२१ पासून ऑनलाईन अर्जाद्वारे देण्यात येत आहे.तसेच २४ मार्च २०२२ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निकटवर्तीयांना ५०, हजार रुपये सानुग्रह अनुदान मदतीसाठी अर्ज करण्याची विहित मुदत देण्यात आली आहे.

यात कोरोना संसर्ग बधीताचा मृत्ये २० मार्च २०२२ पूर्वी झाला असल्यास २४ मार्च २०२२ पासून पुढे ६० दिवस यानुसार २४ मे २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच २० मार्च २०२२ नंतर मृत्यू झाला असल्यास ९० दिवसाच्या आत करता येतील. या मुदतीनंतर आलेले अर्ज केवळ गाऱ्हाणे निवारण समिती जीआरसी द्वारे करता येतील. शिवाय ज्या अर्जदारांनी चुकीचा दावा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थान प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या निर्देशात म्हटले आहे.

Protected Content