भरड धान्य नाव नोंदणीसाठी ३० सप्टेंबर शेवटीची मुदतवाढ

पारोळा प्रतिनिधी । खरीप हंगाम 2021-22 साठी शासनाच्या वतीने मका, ज्वारी व बाजरी ही भरड धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची नाव नोंदणीस सुरुवात झाली आहे. 30 सप्टेंबर ही शेवटचीची मुदत आहे. परंतु या वर्षापासून ऑनलाईन पीक पेरा लावणे व तो सातबारा उतारा काढण्यासाठी शेतकऱ्यांना असंख्य अडचणी येत आहेत.

ऑनलाईन पीक पेरा लावणे व तो सातबारा उतारा काढण्यासाठी शेतकऱ्यांना असंख्य अडचणी येत असल्यामुळे परिणामी नाव नोंदणी पासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता तथा भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याची मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे. शासनाच्या वतीने दरवर्षी भरड धान्याची खरेदीही करण्यात येते. दर वर्षी ही खरेदीची प्रक्रिया व नोंदणीची प्रक्रिया ही विलंबाने होत होती. परन्तु यावर्षी ती नोंदणी प्रक्रिया लवकर सुरू झाली आहे. 3 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील पीक पेरा ऑनलाइन पद्धतीने लावून तो सातबारा उतारा काढून नाव नोंदणी करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने शेतकरी ऑनलाईन पद्धतीने पीक पेरा लावण्याचा प्रयत्न हे करीत आहेत. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी या येत आहेत. मध्यंतरी पिक पेरा ऑनलाइन लावण्याची साईड ही देखील काहीकाळ बंद होती. तसेच फोटो अपलोड न होणे. ऑनलाईन पीक पेरा लावला तरी तो अफ्रॉल नो होणे, उशीराने होणे, डिजिटल उताऱ्यावर ऑनलाईन पीक पेरा न येणे. अशा काही अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत. त्यात नाव नोंदणीची मुदत संपत असल्याने शेतकऱ्यांना पुढे चिंता निर्माण झाली आहे. ऑफलाईन पद्धतीने पिकपेरा लावणे बंद झाल्याने व ऑनलाईन पद्धतीने पीक पेरा लावताना येणाऱ्या अडचणी पाहून या नाव नोंदणीची मुदत अजून किमान महिनाभर वाढविण्याची मागणी यामुळे शेतकऱ्यांकडून होत आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत अवघे 352 शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. त्यात ज्वारी 320 शेतकरी मका 29 व बाजरी 2 शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली असल्याची माहिती शेतकरी सहकारी संघ वतीने व्यवस्थपक भरत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

Protected Content