सागर सीडसवर कारवाई करा : शेतकर्‍याचे निवेदन

मुक्ताईनगर, पंकज कपले | येथील सागर सीडस या दुकानातून घेतलेल्या औषधाच्या फवारणीमुळे पीकाची हानी झाल्यामुळे या दुकानावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन विजय माधव कुलकर्णी या शेतकर्‍याने गटविकास अधिकार्‍यांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केले आहे.

याबाबत वृत्त असे की, विजय माधव कुलकर्णी यांनी आज गटविकास अधिकार्‍यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, त्यांनी २ ऑगस्ट २०२१ रोजी सागर सीडस या दुकानातून बायो आर ३०३ हे औषध घेतले. याची आपल्या सातोड शिवारातील शेतातील मीरची या मिरची पिकावर फवारणी केली. यामुळे पीकावरील रोग नाहीसा होण्याची अपेक्षा होती.

मात्र याच्या अगदी उलट काही दिवसांमध्येच मिरचीचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. या संदर्भात आपण कृषी अधिकार्‍यांकडे तक्रार करून देखील त्यांनी यावर काहीही कार्यवाही केली नाही. यामुळे गटविकास अधिकार्‍यांनी आपल्या पीकाच्या नुकसानीची पाहणी करून संबंधीत सागर सीडस या दुकानावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.

 

Protected Content