तरूणांची आपापसात शिवीगाळ करत हाणामारी; शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेंदालाल मिल परिसरातील लक्ष्मीनगर भागात एकमेकांना शिवीगाळ करीत हामामारी झाल्याची घटना घडली. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहा जणांना शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फिर्याद देण्यात आली.

 

शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गेंदालाल मिल जवळील लक्ष्मी नगर भागात काही जण सोमवारी ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आपसात वाद घालत असल्याची माहिती मिळाली. पोलिस त्या ठिकाणी पोहचले असता सहा जण आपसात एकमेकांशी वाद घालून शिवीगाळ करीत होते. पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी काहीही न ऐकता शिवीगाळ करीत हाणामारी केली. त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोकॉ मनोज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख शेख गनी शेख,  मोइन शेख आरीफ,  कासीम शेख (पूर्ण नाव समजू शकले नाही),  समीर उर्फ गोलू रसूल बेग, विशाल रवींद्र जैस्वाल, वैभव रवींद्र जैस्वाल या सहा जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करीत आहे.

Protected Content