जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापूरा परिसरातील मच्छीबाजार येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणाच्या हातावर धारदार वस्तूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी २३ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वापता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, साहिल शहा सद्दाम शहा वय १८ रा. तांबापूरा हा तरूण बुधवारी २३ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता मच्छिबाजार परिसरात आलेला असतांना रिहान मेहमुद शेख रा. तांबापूरा याने जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत धारदार वस्तूने वार केले आहे. या मध्ये त्यांच्या हाताला आणि मानेवर गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत साहिल शहा यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रिहान मेहमुद शेख रा. तांबापूरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार हे करीत आहे.