पाचोऱ्यात दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना शिंदे गटाकडून निषेध !

पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काश्मीरमधील पेहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा शिवसेना शिंदे गटाने तीव्र निषेध केला आहे. पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी घटनेविरोधात निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अतिरेक्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत …

पेहलगाम हल्ल्यातील दोषींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत यांनी हे निवेदन स्वीकारले.

या निषेध आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख किशोर बारावकर, सुनील पाटील, प्रवीण ब्राम्हणे, जया पवार, मंदाकिनी पारोचे, संदीप राजे पाटील, अशोक निंबाळकर, सतीश चौधरी यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content