यावलमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य नोंदणीला तरुणांचा प्रतिसाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले. या अभियानाला यावल शहरात तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाध्यक्ष समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या नोंदणी कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग नोंदवला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील शहरी भागात पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात आले. यावलमध्ये झालेल्या नोंदणी कार्यक्रमात तालुकाप्रमुख राजेश काटोके, रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हा उपसंघटक नितीन सोनार, शहरप्रमुख पंकज बारी, उपशहरप्रमुख राजू सपकाळे आणि युवा सेना तालुकाप्रमुख अजय तायडे यांच्यासह शहरातील अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

या अभियानाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान महाजन यांनी समाधान व्यक्त केले आणि तरुणांनी मोठ्या संख्येने नोंदणी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच, आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Protected Content