भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे राहणाऱ्या ६० वर्षीय वृध्द महिला ह्या सोमवारी २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेपासून राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २२ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. विमलबाई भास्कर चौधरी वय ६० रा. फुलगाव ता.भुसावळ असे बेपत्ता झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे.
विमलबाई चौधरी ह्या आपल्या कुटुंबासह फुलगावात वास्तव्याला आहेत. सोमवारी २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरात कुणाला काहीही न सांगता कुठेतरी निघून गेल्या. त्यानंतर त्या घरी परतल्या नाही. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांच्या बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांचा मुलगा प्रदिप चौधरी यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश राठोड हे करीत आहे.