धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वाकटुकी गावाजवळील विहिर फाट्याजवळ एकाच्या डोक्यात गावठी पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २२ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजेच्या घडली होती. या गुन्ह्यात अटक केलेल्या राहुल ज्ञानेश्वर कोळी (वय २५, रा. वाकटुकी, ता. धरणगाव) याला धरणगाव न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गोपाल सोमा मालचे (भील) (वय ५०, रा. वाकटुकी, ता. धरणगाव, ह.मु. करमुड, ता. चाळीसगाव) असे मयताचे नाव आहे.
असा आहे जुना वाद
धरणगाव तालुक्यातील वाकटुकी गावात सन २०११ मध्ये ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून राहूल कोळीचे वडील ज्ञानेश्वर कोळी यांची हत्या गोपाल मालचे याने केली होती. त्यावेळी राहूल कोळी हा १६ वर्षाचा होता. त्यांच्याच मांडीवर त्यांचे वडील ज्ञानेश्वर कोळी यांनी प्राण सोडले होते. परंतु या खटल्यातून गोपाल मालचे यांची निर्दोष मुक्तता झाली होती. तेव्हापासून राहूलच्या मनात बदला घेण्याची धगधगती आग मनात कायम होती.
अशी आहे घटना
गोपाल मालचे हे वाकटुकी गाव सोडून तो कुटुंबियांसह करमुड ता. चाळीसगाव येथे स्थायिक झाला होते. दोन दिवसांपुर्वी गोपाल मालचे हे गावात आले होते. याची माहितील राहूल कोळी याला मिळाली. त्याने गावठी पिस्तूल घेवून बुलेटने विहीर फाट्याजवळ दबा धरून बसलेला होता. मंगळवारी २२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता गोपाल मालचे हे आपले खामखेडे येथून आपल्या परिवारासह घरी वाकटूकी येथे परत जात होते. यावेळी राहुलने विहीर फाटा येथे गोपाल मालचे यांच्या कारच्या समोर आपली बुलेट लावली. गोपाल मालचे हे कारमधून खाली उतरताच राहुलने त्यांच्या कपाळाच्या मधोमध नेम धरत गोळी झाडली. यात गोपाल मालचे यांचा जागीच मृत्यू झाला.
निर्घृण हत्या करून पोलीस ठाण्यात हजर
गोळ्या झाडून गोपाल मालचे याची हत्या केल्याची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले, पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे सपोनि प्रशांत कंडा-रे, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ जितेंद्र पाटील, विष्णू बिन्हाडे यांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताचा शोध सुरु केला. दरम्यान, पोलीस आपल्या मागावर असल्याचे संशयित राहल कोळी याला समजले. तब्बल १४ वर्षानंतर वडीलांच्या खूनाचा बदला खूनाने घेवून संशयित हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.
न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
हत्त्येची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाचे उपअधिक्षक घोलप यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयित आरोपी राहूल कोळी याला धरणगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.