भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाउंडेशन संचलित, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथे विद्यार्थ्यांना संविधानाची आणि संसदीय कामकाजाची माहिती होण्यासाठी युथ पार्लमेंट हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी चक्क एक संसद चालविली. यात सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, लोकसभा अध्यक्ष यांच्यातील वाद-प्रतिवाद, कायद्यावर चर्चा, पंतप्रधान, वित्तमंत्री, रक्षा मंत्री, कृषी मंत्री, विरोधी पक्ष नेता असा हुबेहूब रंगमंच तयार करून विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण चर्चा सादर केली.
या साऱ्या कार्यक्रमाचे मूल्यमापन गोदावरी समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी केले. यावेळी स्कूलच्या या स्तुत्य कार्यक्रमाचे कौतुक करत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आणि त्यांच्या कार्याची पावती म्हणून डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी स्कूलच्या प्रिन्सिपल अनघा पाटील, शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती.