कार-स्पोर्ट्स बाईकच्या अपघातात बाईकवरील तरूण ठार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वसई मध्ये कारची स्पोर्ट्स बाईकला धडक बसल्यानंतर तरूणाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. ही घटना १० जुलैची आहे. अपघातामध्ये कार चालक तरूण पांडे होता. तरूणचे वडील नालासोपरा मध्ये भाजप कार्यकर्त्याचा मुलगा आहे. दरम्यान दुचाकीवरील मुलाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र त्याला वाचवण्यात यश आले नाही. तरूण पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, मृत मुलाचे नाव अमित सैनी आहे. अमित हा वसई मध्ये फादरवाडीचा रहिवासी होता. सैनी हा बाईकवर हेल्मेट घालून बसला होता. तरूण पांडे याची डाव्या बाजूने गाडी ओव्हरटेक करताना गाडीचा पुढचा भाग आपटून तो खाली पडला. तरूण पांडे याने कार थांबवली. जवळच असलेल्या दोघांची मदत घेत त्याने सैनीला रूग्णालयामध्ये नेले. मात्र अमितचा यामध्ये मृत्यू झाला होता. रिपोर्ट्सनुसार तरूणने अमित बैशुद्ध असल्याचे लक्षात येताच त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर तरूण पांडे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. ही कार तरूणचे वडील प्रकाश पांडे यांच्या नावावर आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Protected Content