चहार्डी येथील खदानीतील पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील खदानीच्या पाण्यात बुडून किरण लोटन राजवाडे (४०) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना २० रोजी दुपारी ४:२० वाजता घडली. किरण राजवाडे यांना खदानीच्या पाण्यात बुडल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे दाखल केले. डॉ. तृप्ती पाटील यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

चोपडा शहर पोलीस ठाण्यात डॉ. तृप्ती पाटील यांच्या मृत्यूच्या निवेदनावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणातील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानेश्वर जवागे करीत आहेत.

किरण राजवाडे (धनगर) हे चोपडा आगारात वाहक म्हणून काम करत होते. त्यांचे शवविच्छेदन डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. या घटनेचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटना घातक की अपघाती आहे, याबाबतचा तपास सुरू आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती पाटील यांच्या खबरीवरून अ.मृ रजि.नं. १०/२०२५ बि.एन.एस.एस.१९४ प्रमाणे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक तपास हवालदार ज्ञानेश्वर जवागे हे करीत आहेत.

Protected Content