जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वावडदा येथून जळगावात परतत असताना रामदेववाडी जवळ गुरुवारी २८ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास एका दुचाकींचा भीषण अपघात झाल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. यातील एकाचा शुक्रवारी दुपारी १ वाजता उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती घेण्याचे काम सुरु होते.
निलेश गोकुळ पाटील (वय २५, रा. राम मंदिर, मेहरूण, जळगाव) व महेश रविंद्र खोरपडे (वय ३०, पाणीपुरवठा कार्यालय परिसर, मेहरूण, जळगाव) हे दोघे वावडदा येथून गुरुवारी २८ रोजी संध्याकाळी ६. ३० वाजेला जळगावात परतत होते. रामदेववाडीजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यावेळी नागरिकांनी व नातेवाईकांनी निलेशला खाजगी रुग्णालयात तर महेश खोरपडे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना शुक्रवारी २९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास निलेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तर महेश खोरपडे याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निलेश पाटील याचे पश्चात वडील, १ भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. दरम्यान, म्हसावद दूरक्षेत्रात नोंद होऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.