देशी कट्टयासह तरूणाला अटक : मुक्ताईनगर पोलिसांची कामगिरी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पोलिसांनी गावठी कट्टा घेऊन फिरणार्‍या तरूणाला जेरबंद केले असून त्याच्यासह तिघांच्या विरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी मुक्ताईनगर पोलिस वेळोवेळी नाकाबंदी करत असतात. अशाच प्रकारे काल रात्री सव्वानऊच्या सुमारास नाकाबंदी करत असतांना पोलिसांना रवींद्र उर्फ माया तायडे हा तरूण गावठी कट्टयासह आढळून आला. त्याची झडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. तायडे याची चौकशी केली असता त्याने नशिराबाद येथील युवराज कडू होंडाळे याच्याकडून १९ हजार रूपयात हा कट्टा खरेदी केल्याची माहिती दिली. यासाठी मुक्ताईनगर येथील मयूर विजयसिंग राजपूत याचा फोन पे क्रमांक वापरल्याचेही त्याने सांगितले.

या माहितीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात रवींद्र उर्फ माया तायडे, युवराज कडू होंडाळे व मयूर विजयसिंग राजपूत या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तायडे आणि होंडाळे यांना ताब्यात गेण्यात आले आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर राजकुमार शिंदे व पोलीस निरीक्षक नागेश मोहीते यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी. प्रदीप शेवाळे ,पो.उप.निरी. राहुल बोरकर , पोहेकॉ/३०२ लिलाधर भोई ,पोना/३१०० धमंद्र ठाकुर, पोना/३०४९ मोतीलाल बोरसे चापोना/३०२६ सुरेश पाटील , पोअं/१८९ रविंद्र धनगर , प्रशांत चौधरी , राहल बेहनवाल यांच्या पथकाने केली आहे.

Protected Content