जळगाव, प्रतिनिधी | देशातील तरुणाचे जीवन भरकटत आहे. तरुणांनी देशधर्मासाठी, राष्ट्राहिताचा विचार करावा. जेणेकरून देश समृद्ध तर होईलच मात्र तरुणांना वैचारिक समृद्धी मिळेल असे प्रतिपादन हभप पल्लवीताई महाराज दोंद यांनी केले.
पिंप्राळयाचा राजा स्नेहल प्रतिष्ठान तर्फे गणेशोत्सवानिमित्त कीर्तनमाला आयोजित करण्यात आली आहे. पाचवे पुष्प हभप पल्लवीताई महाराज यांनी गुंफले. त्यांनी संतसंगतीचे परिणाम उदाहरणासह पटवून दिले. जीवनात सांगत कोणाची करावी यासाठी त्यांनी काही अभंगांचा दाखला दिला. तरुणांनी जीवनात निर्व्यसनी, देशभक्ताची, राष्ट्रभक्ताची संगत करावी. या संगतीने जीवन उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही असेही हभप पल्लवीताई महाराज दोंद यांनी सांगितले. सूत्रसंचालन धनंजय पाटील व आभार मोहन कुंभार यांनी मानले.