मनुष्य जीवनात मिळालेल्या मन आणि बुद्धीचा चांगला उपयोग करावा – अर्चना दीदी

chopda news

चोपडा, प्रतिनिधी । मनावर संयम करणे हे फक्त मनुष्य जन्मातच मिळू शकते कोणत्याही साधू सतांना आहारदान देण्याचे भाग्य देखील मनुष्य जन्मात मिळते आणि सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे मन आणि बुद्धी हे गुण मनुष्याला मिळाले आहेत त्याचा जीवनात सदउपयोग करून घ्यायला पाहिजे असे मौलिक विचार प.पु.बाल ब्रह्मचारी श्री बसंतजी महाराज यांच्या सुशिष्या बाल ब्रह्मचारी अर्चना दीदी यांनी केले.

येथील पांचाळेश्वर गल्लीतील तारण तरण जैन समाजाचे पर्युषण पर्वासाठी आलेल्या श्री अर्चना दीदी यांनी येथील समाज मंदिरात प्रवचन देत असताना त्या बोलत होत्या पुढे म्हणाल्या की, संयम विना मनुष्य जीवन म्हणजे विना ब्रेकची गाडी होय किंवा विना लगामचा घोडा होय मनुष्याचे शब्दच शत्रू अथवा मित्र असतात त्यामुळे खाणे योग्य आहे तेच खा, बोलणे योग्य असेल तेव्हढेच बोला आणि तेच बोला. पेहराव घालण्या योग्य आहे तेच पेहराव घाला. पाहण्या योग्य आहे तेच पहा, आपल्या जीवनात जर चांगले संस्कार असतील तर अधोगती कधीच होणार नाही असे अनेक उदाहरण दिले ते पर्युषण पर्व निमित्त चोपडा येथे आले होते. यावेळी समाजाचे शेकडो लोक हजर होते अध्यक्ष संजय जैन, उपाध्यक्ष सुभाषचंद जैन आलेल्या मान्यवराचे स्वागत केले यावेळी महेंद्र जैन यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.

Protected Content