लोंढे येथे संत रोहिदास महाराज जयंती साजरी

rohidas maharaj jayanti londhe

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील लोंढे येथे महान संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी कार्य केले. संत रोहिदास यांनी उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात येऊन आपली सर्वसमावेशक शिकवण दिली. त्यांचा आदर्श घेऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, मथुराई शिक्षण संस्थेचे सुधीर पाटील, सरपंच राहुल बागुल, अण्णा अहिरे, वाल्मिक अहिरे, जितू चौधरी, राहुल शेठ जैन, पोलीस पाटील वसंत निकम, संतोष अहिरे, रविंद्र अहिरे, राजू अहिरे, भगवान सुरंजे, अरुण निकम आदी उपस्थित होते.

Protected Content