जळगावात सेव्ह मेरीट सेव्ह नेशनतर्फे ‘मिनी मॅरेथॉन’ उत्साहात

jalgaon

जळगाव प्रतिनिधी । सेव्ह मेरीट सेव्ह नेशन जळगाव समितीतर्फे रन फॉर मेरीट या कार्यक्रमास जळगावकरांकडून उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमास शहरातील विविध संघटना, विद्यार्थी आणि सामाजिक प्रतिष्ठीत व्यापारी, लहान मुले, ज्येष्ठ नागरीक यांनी एकत्रितपणे नाव नोंदवून मीनी मॅरेथॉनसाठी सहभाग नोंदविला होता. आरक्षणाची मर्यादा ५० टक्के रहावी यासाठी गेल्या वर्षभरापासून राज्यभर सेव्ह मेरीट सेव्ह नेशन ही संघटना अनेक मार्गाने जानजागृती संकल्पना राबवून जनजागृती करत आहे. संकल्पनेचा एक भाग म्हणून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ९ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी एकाच वेळी रन फॉर ह्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सागरपार्क – भाऊंचे उद्यान – महाबळ चौक – सागर पार्क मार्गाद्वारे करण्यात आले.

समाजातील ज्येष्ठ डॉक्टर, चार्टड अकाऊटंट, वकील, उद्योगपती, व्यावसायीक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी सकाळी सागरपार्कवर सकाळी ७ वाजता डॉ. चंद्रशेखर सिकची, डॉ. दिपक अट्टल, ॲड. नारायण लाठी, सतिष मित्तल यांच्याहस्ते रनचे उद्घाटन करण्यात आले. मेरीटवर होणाऱ्या अन्यायाचे गांभीर्य लक्षात घेता आयोजित करण्यात आलेल्या रन फॉर मेरीट कार्याक्रमास विविध संघटनानी सक्रीय सहभाग नोंदविला. रनचे समारोप करतांना डॉ. चंद्रेशेखर सिकची, डॉ. दिपक अट्टल यांनी मार्गदर्शन केले. देशात मेरिटवर होणाऱ्या अन्याय व त्यामुळे देशाबाहेर स्थाईक होणारे बौध्दीक व कौशल्यसंपदा असणाऱ्या नागरीक ह्या समस्येचे गांभीर्याची उपस्थितांना जाणीव झाली.

कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रेमलता सिंग, रेखा चांडक, संगिता चावला, डॉ. किर्ती देशमुख, वैशाली बडगुजर, वनीता चौधरी, तनुजा, हर्षा केसवानी, डॉ.रवी महाजन, मिना डोकानिया, डॉ.सिमा पाटील, महेश मुणोत, मोहन लाड, संदीप लाड, अमित बेहेडे, सपना झुनझुनवाला, योगेश महाशन्दे, कविना दातारा यांनी परीश्रम घेतले.

Protected Content