जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात एका ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची घटना शनिवारी ३ मे रोजी रात्री ११ वाजता घडली. मयत तरुणाचे नाव आकाश पंडीत भावसार (वय ३०, रा. अयोध्या नगर) असे आहे.
आकाश ट्रान्सपोर्ट नगर येथे वाहन भरण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याचा पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू होता.
शनिवारी रात्री सासरच्या मंडळींनी हॉटेल ए-वनजवळ त्याला अडवून धारदार शस्त्रांनी मांडी, छाती आणि गुप्तांगावर वार करून गंभीर जखमी केले. तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, चार संशयित आरोपींची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक आणि मित्रपरिवार यांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.