किरकोळ कारणावरून एकाला शिवीगाळ व धमकी

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील खर्दे शिवारातील शेतात किरकोळ कारणावरून एकाला शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना घडली आहे. या संदर्भात शुक्रवारी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, ललित गोविंद पाटील वय 41 रा. खर्दे तालुका धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. खर्दे शिवारातील शेतात 1 मे रोजी दुपारी 4.30 वाजता ते काम करत असताना किरकोळ कारणावरून आशाबाई शालीक कोळी, शालिक कोळी, भरत कोळी, भैया कोळी आणि सोबत त्याची पत्नी, राजू सुका बाविस्कर आणि गणेश सपकाळे सर्व रा. खरेदी ता. धरणगाव यांनी शिवीगाळ करत धमकी दिली. दरम्यान या घटनेबाबत शुक्रवारी 2 मे रोजी रात्री 9 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर शिंदे करत आहे.

Protected Content