Home Cities अमळनेर शिक्षकाचे बंद घर फोडून रोकडसह दागिन्यांची चोरी

शिक्षकाचे बंद घर फोडून रोकडसह दागिन्यांची चोरी

0
113

अमळनेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील खवशी गावामध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 73 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिद्धार्थ वसंत शिरसाठ वय 41 रा. खवशी ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून एका शाळेत शिक्षक म्हणून ते नोकरीला आहे. 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान त्यांच्या घर बंद असताना अज्ञात चोट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने असा ऐकून 2 लाख 73 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. दरम्यान ही घटना उघडकीला यानंतर सिद्धार्थ सिद्ध शिरसाठ यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहे.


Protected Content

Play sound