Home क्राईम तरूणावर चॉपरने वार केले जखमी; चांदीचीही चैन लांबविली

तरूणावर चॉपरने वार केले जखमी; चांदीचीही चैन लांबविली

0
105

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गांधी मार्केट जवळ एका तरूणाला चाकूने वार करून ४ हजार रूपये किंमतीची चांदीची चैन चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शोएब तस्लीम खान वय २६ रा. पिंप्राळा हुडको, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बांधकामचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी १४ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता तो कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील महात्मा गांधी मार्केट येथे असलेला होता. त्यावेळी त्याला दोध्या उर्फ उमेश धोबी, भुषण (पुर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी असे एकुण तीन जणांना रस्ता आडवून चॉपरने पोटावर वार करून गंभीर जखमी करत त्यांच्या जवळून ४ हजार रूपये किंमतीची चांदीचे चैन जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवार १६ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रविंद्र बागुल हे करीत आहे.


Protected Content

Play sound