अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका भगाात एका महिला आपल्या मुलांसह फरहान उर्फ असलम शब्बीर शेख (वय २५) या व्यक्तीसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ राहते. मात्र, याच व्यक्तीने संबधित महिलेच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता घडला होता. याप्रकरणातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी मेहरूण परिसरातून अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेचे पती २०१८ पासून काही न सांगता घर सोडून निघून गेले आहेत. त्यानंतर संबधित महिलेची ओळख २०१९ मध्ये फरहान उर्फ असलम शब्बीर शेख याच्याशी झाली. तेव्हापासून ही महिला आपल्या मुलांसह फरहानसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होती. मात्र, या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर फरहानने वाईट नजर ठेवत, वेळोवेळी शरिर संबंध करु देण्याची मागणी करत होता. तसेच कोणाला काहीही सांगितले तर मुलीच्या आई व भावंडांना मारुन टाकण्याची धमकी देत होता. ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता फरहानने मुलीचा विनयभंग केला. याबाबतची माहिती महिलेला मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन फरहानवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून फरहान हा फरार होता. सोमवारी १५ एप्रिल रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने फरहानला मेहरूण परिसरातून अटक केली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेंद्र कांडेलकर, साईनाथ मुंढे, चंद्रकांत पाटील इमरान बेग यांचा समावेश होता. संबधित संशयित आरोपीला मंगळवारी १६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देऊन कारागृहात रवानगी केली आहे.

Protected Content