भाजपा कार्यालयात समर्थ बुथ अभियानांतर्गत बैठक

जळगाव प्रतिनिधी । बळीराम पेठेतील भाजपा कार्यालयात समर्थ बुथ अभियानांतर्गत १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक बुथवर ध्वजवंदन व भारतमातेचे पुजनाचा कार्यक्रम होणार असल्याबाबत आज बैठक घेण्यात आली. 

याप्रसंगी विभागीय संघटनमंत्री रवि अनासपुरे, उत्तर महाराष्ट्र बुथ संपर्क प्रमुख बबनराव चौधरी, जिल्हा महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. यावेळी यावेळी रवि अनासपुरे यांनी समर्थ बुथ अभियानाचा मंडळा निहाय सविस्तर आढावा घेतला. त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, भाजपाचे पुर्वी दोन खासदार होते. आता ३०३ खासदार आहे. आणि आता ४०० च्या पार जायचे आहे. त्यामुळे  समर्थ बुथ अभियान जळगाव शहरातील ३९१ बुथवर १५ ऑगस्ट रोजी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या प्रत्येक बुथ वर ध्वजवंदन व भारत माता पुजन करायचे आहे.

याबैठकीला जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा श्रेत्र प्रमुख दिपक साखरे, जिल्हा पदाधिकारी बापु ठाकरे, महेश चौधरी, प्रा. भगतसिंग निकम, राजेंद्र मराठे, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, मंडल अध्यक्ष विनोद मराठे, शक्ति महाजन, विजय वानखेडे, केदार देशपांडे, आघाडी अध्यक्ष लताताई बाविस्कर, गणेश वाणी, जयेश भावसार, गुडू भाई, हेमंत जोशी, अनिल जोशी आदी उपस्थित होते. 

Protected Content