शेत जमिनीच्या वादातून तरूणाला लोखंडी रॉडने मारहाण !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील लोन सिम शहरातील शेतात जमिनीच्या वादातून एका ४० वर्षीय तरुण शेतकऱ्याला तीन जणांनी शिवीगाळ करत लाकडी दांडका आणि लोखंडी रॉडने डोक्यावर आणि कपाळावर मारून गंभीर दुखापत केल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. या संदर्भात शनिवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता मारवड पोलीस ठाण्यात तीन जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश अर्जुन पाटील वय-४०, रा. लोन सिम ता. अमळनेर हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून शेती करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. दरम्यान रवींद्र रामदास पाटील यांनी २०१२ मध्ये बखड जमीन नोटरी करून विकत घेतली होती. दरम्यान महेश याने माझ्या वडिलांना दारूपाजून आमचे जमीन बडकावल्याचा जाब विचारला असता महेश पाटील याला रवींद्र रामदास पाटील, शुभम रवींद्र पाटील, तुषार रवींद्र पाटील या तिघांनी लाकडी दंडका आणि लोखंडी रॉडने डोक्याला आणि कपाळाला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. या संदर्भात शनिवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश पाटील हे करीत आहे.