जळगावातून परप्रांतीय अल्पवयीन मुलीचे अपहरण !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणारी परप्रांतीय एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याची गुरूवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आली आहे. या संदर्भात शनिवारी ११ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात राहणारी परप्रांतीय १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ती व तिचे आई-वडील हे खेळणी विकून आपला उदरनिर्वाह करत असतात. गुरुवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पीडित मुलगी ही खेळणी विकण्यासाठी जाते असे सांगून घरातून निघून गेली. त्यानंतर ती घरी परतले नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही, अखेर तिच्या पालकांनी शनिवारी ११ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहे.