भादली येथे जुन्या भांडणाच्या वादातून तरूणाला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला शिवीगाळ करून तिघांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील भादली येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर वृत्त असे की, सुशिल प्रकाश बोरसे (वय-२३) रा. भादली ता.जि.जळगाव या तरूणाला गावातील शिवाजी धुडकू पाटील, राजेंद्र भिमराव पाटील आणि सोनु शिवाजी पाटील रा. भादली यांनी जुन्या भांडण्याच्या कारणावरून २२ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सुशिल बोरसे यांच्या घरासमोर येवून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. शिवीगाळ करण्याचा जाब विचारला असता याचा राग येवून तिघांनी पुन्हा शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. यातील शिवाजी पाटील यांनी लाकडी दांडूक घेवून डोक्यावर मारहाण केली. या मारहाणी सुशिल बोरसे गंभीर जखमी झाले. वैद्यकीय उपचार घेवून  २३ मार्च रोजी सायंकाळी तालुका पोलीसात धाव घेतली. सुशिल बोरसे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाटील करीत आहे. 

Protected Content