Home क्राईम भावाला मारहाण करत तरुणीचा विनयभंग

भावाला मारहाण करत तरुणीचा विनयभंग

0
105

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । विहिरीतून पाणी काढण्याच्या कारणावरून भावाला मारहाण करत तरुणीचा विनयभंग केल्याची घटना गुरुवार १६ मे रोजी दुपारी १२ वाजता जळगाव तालुक्यातील वसंतवाडी गावात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी १७ मे रोजी पहाटे ३ वाजता तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वसंतवाडी गावातील एका भागात १८ वर्षीय तरुणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवार १६ मे रोजी दुपारी १२ वाजता तरुणीही आपल्या भावासोबत गावातील एका विहिरीवर धुणं घुण्यासाठी गेली होती. त्यावेळी विहिरीतून पाणी काढण्याच्या कारणावरून तरुणीसह तिच्या भावाला गावात राहणारे संजय जगराम चव्हाण, दशरथ जगराम चव्हाण आणि ज्ञानेश्वर चव्हाण या तिघांनी तरुणीसह तिच्या भावाला मारहाण करत तिचा हात पकडत विनयभंग केला. तसेच तिच्या भावाला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी १७ मे रोजी पहाटे ३ वाजता मारहाण करणारे संजय जगराम चव्हाण, दशरथ जगराम चव्हाण आणि ज्ञानेश्वर चव्हाण या तिघांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound