जळगाव प्रतिनिधी । शहरातील मु.जे.महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी या विभागांतर्गत एम.ए. द्वितीय वर्षीय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून डॉ. सौ. शरयु विसपूते आणि डॉ. सौ. प्रतिभा कोकांदे यांचे “योग – काळाची गरज” या विषयावर मार्गदर्शन आणि संबंधित योगाचे प्रात्यक्षिके केले जाणार आहे.
शहरातील वाघ नगर जवळील वाघ नगर व रूक्मिणी नगर परीसरातील रहिवाश्यांसाठी मोफत योग शिबीराचे आयोजन शनिवार 21 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2019 या कालावधीत दररोज सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान प्रात्यक्षिके केले जाणार आहे. या सात दिवसीय मोफत शिबीर घेण्यात येणार असून गुरूदत्त मंदीर परीसर, श्रीधर नगर, रूक्मीणी नगर परीसरातील नागरीकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक सोहम डिपार्टमेंट ऑफ योग आणि नॅचरोपॅथीतर्फे डॉ. सौ. शरयु विसपूते आणि डॉ. सौ. प्रतिभा कोकांदे यांनी केले आहे. आयोजित केलेल्या शिबीरासाठी सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी विभागाचे प्राचार्या आरती गोरे, प्रा. देवानंद सोनार, प्रा. पंकज खासबागे, गितांजली भंगाळे, ज्योती वाघ यांचे मार्गदर्शन लाभत आहेत.