होय आव्हाड यांनी राजीनामा दिला : जयंत पाटील

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जितेंद्र आव्हाड यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून याचा राजीनाम्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा भाजपचे नेते आशीष शेलार यांनी केला आहे.

माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर आधी विवीयाना मॉलमधील मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर काल रात्री त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे संतापलेल्या आव्हाड यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे. यावरून विविध आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. आव्हाड यांच्या समर्थकांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले. तर राज्यभरात ठिकठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ आंदोलने करण्यात येत आहेत.

दरम्यान, या पार्श्‍वभूमिवर, आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, असं आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाड यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला . पण आव्हाड आपल्या निर्णयावर ठाम होते आणि अखेर जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा असून याबाबतची माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content