यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर माथेफिरू समाजकंटकानी केलेल्या हल्ल्याचा यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आले आहे.
यावल येथील तहसील कार्यालयाच्या नविन प्रशासकीय ईमारती समोर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार यांच्या सिल्वर ओक या त्यांच्या राहत्या बंगल्यावर काही समाजकंटक माथेफिरूनी अचानक हल्ला केल्याची संतापजनक घटना ही मुंबई येथे घडली असुन या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले, पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तोंडाला काळी पट्टी लावुन आंदोलन करण्यात येवुन शरद पवार यांच्या घरावरील झालेल्या अत्यंत निंदनिय घटनेचा जाहीर शब्दात तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या पुरोगामी महाराष्ट्र राज्यात अशा प्रकारे लोक नेत्यांच्या घरावर झालेल्या या सर्व घटनेचा तात्काळ तपास लावुन यातील सामील असलेल्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांना देण्यात आलेत, यावेळी पक्षाचे प्रा . मुकेश येवले, अतुल पाटील, विजय पाटील , गिरधर पाटील, अय्युब, नाना बोदडे, मोहसीन खान , कामराज घारू, विकास पाटील, काँग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, राष्ट्रवादी महीला आघाडीच्या व्दारकाबाई पाटील आदी राष्ट्रवादी आणी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे यावेळी आंदोलनात सहभागी झाले.