यावल प्रतिनिधी । येथील सातोद कोळवद या मार्गावरील तहसील कार्यालयाची नव्याने बांधण्यात आलेल्या तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे तहसील विभागाने औपचारिकरित्या पुजार करून इमारतीत प्रवेश केला.
या सुमारे 3 कोटी खर्चाने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीच्या प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी आ.शिरीषदादा चौधरी यांनी मागील 6 वर्षापुर्वीच पाठलाग करून प्रशासकीय मंजुरी मिळुन घेतली होती तर या इमारतीचे बांधकाम पुर्णत्वाकडे घेवुन जाण्यासाठी माजी आ.हरीभाऊ जावळे यांनी महत्वाची भुमिका बजावली. पाच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पुर्ण होवुन अखेर तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी आज २८ डिसेंबर २०१९ रोजी आपले यावल शहरातील सुमारे 100 वर्षापुर्वी बांधण्यात आलेल्या ब्रिटीशकालीन तहसीलच्या इमारतीतुन आपले संपुर्ण कार्यालय आज सातोद-कोळवद मार्गावरील नवीन प्रशासकीय इमारतीतगृह प्रवेश केला.
याप्रसंगी महसुलचे सर्व अधिकारी व कर्मचारी हे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रशासकीय इमारतीस कार्यालयास संरक्षण भिंत नसल्याने महसुली कामकाजासाठी येणाऱ्या नागरीकांसाठी गैरसोय व अडचणी निर्माण होण्याची ही शक्यता काही जाणकारांकडुन व्यक्त होत आहे. शासनाने तात्काळ या प्रशासकीय इमारतीला संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी होत आहे.