Home क्राईम कचरा टाकण्यावरून दाम्पत्यास मारहाण; चौघांच्या विरोधात गुन्हा

कचरा टाकण्यावरून दाम्पत्यास मारहाण; चौघांच्या विरोधात गुन्हा

0
103
FIR


यावल प्रतिनिधी | कचरा टाकण्याच्या कारणावरून तालुक्यातील साकळी येथील दाम्पत्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला असून याबाबत चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहीती अनुसार धनराज लोटू कोळी (वय ४१ वर्ष राहणार साकळी) हे दिनांक १० जुलै रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबा सोबत बसले होते. याप्रसंगी संशयीत कैलास कोळी, जनार्दन कोळी, विलास कोळी व एका महीलेने त्यांच्या घरात घुसुन पुन्हा आमच्या घरा समोर कचरा लावला तर तुम्हाला पाहुन घेवु अशी धमकी देवुन विलास कोळी याने त्याच्या हातातील लाकडी काठीने धनराज कोळी यांच्या कपाळावर डोळयाजवळ मारहाण करून दुखापत केली व लाथाबुक्याने मारहाण करीत धनराज कोळी यांच्या पत्नीस डाव्या हातावर काठीने मारहाण करीत दुखापत केली.

या प्रकरणी धनराज लोटु कोळी यांनी यावल पोलीसात फिर्याद दिल्याने या मारहाणीच्या गुन्ह्मातील संशयीत कैलास कोळी , जनार्दन कोळी, विलास कोळी व एक महीला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत जख्मी झालेले धनराज कोळी यांना उपचारार्थ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . या घटनेचा तपास पोहॅकॉं संजय देवरे हे करीत आहेत.


Protected Content

Play sound