यावल प्रतिनिधी । तालुक्यातील नीमगाव जवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत वृत्त असे की, यावल पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान समशेर खान पठान यांचे जेष्ठ बंधु इसहाक खान समशेर खान (वय ७२ रा. आझादनगर भुसावळ) हे यावल येथे काल दिनांक १५ नोव्हेंबर रोजी एका साखरपुडयाच्या कार्यक्रमास सहभाग घेण्यासाठी आपली पत्नी जुलैखा अन्जुम (वय ६५) वर्ष यांच्या सोबत आले होते. हा कार्यक्रम आटोपुन ते सायंकाळी सातच्या सुमारास भुसावळ येथे आपल्या गावी निघाले असता भुसावळकडुन येणार्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच ०३ डीएच५८२७ या वाहनाने निमगाव जवळ त्यांच्या एमएच १९ एएफ ५०९४ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. या भिषण अपघातात त्यांचा मृत्यु झाला असुन, त्यांच्या पत्नी जुलैखाबी अन्जुम या अपघातात गंभीर जख्मी झाल्या आहेत.
याबाबत यावल पोलीस स्टेशनमध्ये मयताचा मुलगा नाजीम खान इसहाक खान यांनी फिर्याद दिल्यानुसार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.