Home Cities जळगाव जळगावात बळीराजाला अभिवादन

जळगावात बळीराजाला अभिवादन

0
112


जळगाव प्रतिनिधी । चक्रवर्ती बळीराजा गौरव दिनाचे औचित्य साधून आज शहरातील काव्यरत्नावली चौकात बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

शहरातील काव्यरत्नावली चौकात आज सकाळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, मी स्वत: बळीराजाचा पुत्र आहे. बळीराजामुळेच आज जगाला अन्नधान्य मिळते. यामुळे आजचा दिवस हा बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.

या कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, मराठा सेवा संघाचे राम पवार, सुरेश पाटील, वाल्मीक पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील गटनेते रवींद्रनाना पाटील, परिवर्तनचे संस्थापक शंभू पाटील, पुरूषोत्तम चौधरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound