यावल येथे अल्पवयीन मुलीला न्याय मिळवण्यासाठी शिवसेनेतर्फे निवेदन

yawal news 3

यावल, प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील वैजापुर येथील दोन अल्पवयीन सख्या बहीणींवर अत्याचार करणाऱ्या नराधम देवेन्द्र मोरे याच्यावरील खटला हा जल्दगती न्यायलयात चालवुन गुन्ह्यातील आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणी निवेदनाद्वारे शिवसेना आदीवासी सेलच्या यावल तालुका शाखेच्या वतीने शिवसेना जिल्हा उपप्रमुख आणी शिवसेना तालुकाप्रमुख रवी सोनवणे व शिवसेना आदीवासी सेलचे तालुकाप्रमूख हुसैन जहाँगीर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात शिवसेना आदीवासी सेलचे तालुकाध्यक्ष हुसैन जहाँगीर तडवी यांनी दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चोपडा तालुक्यातील वैजापुर येथील दोन अल्पवयीन आदीवासी समाजाच्या सख्या बहीणींवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारावरील खटला हा जलद न्यायलयात चालवण्यात येवुन आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात आवी व आरोपीवरअॅट्रासिटी कायदानुसार गुन्हा दाखल करून या गुह्यातील आरोपी देवेंद्र मोरे याच्यावर अपहरण व पिडीतास जिवे ठार मारण्याप्रयत्न या गुन्ह्याच्या एफआयआर मध्ये समावेश करण्यात यावा, सदरच्या गुन्ह्याचे गांर्भीय बघता गुन्ह्याची चौकशीसाठी उच्च अधिकाऱ्याची नेमणुक करावी, त्याचप्रमाणे या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, दोघ पीडीत बहीणींना मनोधर्य योजनेव्दारे समाजकल्याण विभागाकडुन तात्काळ लाभ मिळवा, पीडीत मुलीच्या शिक्षणाची व पालन पोषणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशा मागणीचे निवेदनशिवसेना आदीवासी सेल व शिवसेना युवा अल्पसंख्यांक सेलच्या वतीने यावल येथील निवासी नायब तहसीदार आर.के. पवार यांना देण्यात आले.

Protected Content