मॉडर्न इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात

शेअर करा !

यावल प्रतिनिधी । येथील मॉडर्न इंग्लिश मेडीयम स्कूलतर्फे जागतिक आदिवासी दिन आणि क्रांतीदिन हा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरा करण्यात आला.

जागतिक आदिवासी आणि क्रांती दिनानिमित्त हरिपुरा येथील आदिवासी गरजु कुटुंबातील लोकांना जिवनावश्यक वस्तु गहू, तांदूळ, डाळ, अंघोडीचा साबण, कपडे धुण्याचे साबण बिस्कीट पुडा, एकत्रित असलेले धान्यांचे किट आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एम.बी. तडवी, आदिवासी संघटना, अध्यक्षा नीता गजरे, उपाध्यक्ष भूषण नागरे, सचिव धिरज पाटील यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी मिनल महाजन, पूजा मोरे, साक्षी अग्रवाल, सुनीता वाघ, शारदा पांडव इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!