यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचे भीषण परिणाम दिसून येत असून आज एक शेतकरी शेतात काम करत असतांनाच उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
यावल तालुक्यातील मनवेल येथील राहीवासी शेतकर्याचा येथुन जवळ असलेल्या चोपडा तालुक्यातील मितावली येथे शेतातील काम करीत असताना तिव्र उष्मघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि.१३ मे रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली आहे .
उषघाताने मरण पावलेले मनवेल येथील रहिवाशी हुकूमचंद लक्ष्मण पाटील (वय ६७ ) हे आपल्या मितावली तालुका चोपडा येथील शेतात जे.सी.बी.मशीनने शेतातील कामे करीत होते. वाढत्या तिव्र तापमानामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर काही मिनिटांमध्येच त्यांचा शेतातच मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मनवेल येथे सायंकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. मयत शेतकरी हुकुमचंद पाटील यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा तीन भाऊ, पुतने असा परीवार आहे. दरम्यान, येत्या काही दिवसापर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने सर्वांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता असल्याचेही यातून अधोरेखीत झाले आहे.