यावल प्रतिनिधी । येथील एका अकरा वर्षाच्या मुलीचे सुमारे दीड वर्षापूर्वी अपहरण झाले होते. या मुलीने तिच्या आजोबाला फोन करून आपण उत्तरप्रदेशात असल्याची माहिती दिल्याने तिच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाला आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीती अनुसार भिमसिंग गंगाराम कोळी , वय ६५ वर्ष , राहणार धोबीवाडा यावल यांची११ वर्षीय नात ही दिनांक १९ / ११ / २०१९ रोजी सकाळी पावणेबारा वाजता कै. सिताबाई दामोदर देवकर या शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेण्यासाठी गेली असता ती शाळेत वेळेवर पहोचली. पण ती दफ्तर ठेवुन बाहेर गेली ती आलीच नाही. शाळेच्या इतर विद्यार्थीनी सांगीतले की तिला कुणीतरी व्यक्ती ही ऑटोरिक्शात बसवुन घेवुन गेला नंतर मग ती शाळेत पहोचलीच नसल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती मिळुन आली नाही.
यानंतर भिमसिंग कोळी यांनी त्यांच्या जळगाव येथील सुप्रीम कॉलनी राहणार्या त्याचे मुली व जावई यांच्याकडे ही शोध घेण्यात आले असता त्या ठिकाणी मुलगी आणि नात मिळून आले नाहीत. वरील घटनेमुळे कोळी व त्यांची पत्नी गेल्या काही दिवसापासुन बिघडलेल्या मानसिक स्थितीत होते. मात्र दरम्यान दिनांक २४ / ४ / २०२१ रोजी अचानक अपहरण झालेल्या नातीचचा सकाळी ४ वाजता फोन आला त्यावेळी तिने सांगीतले की मी उत्तर प्रदेश येथील नविनसिंग उर्फ गुड्ड रामा शंकरसिंग (राहणार बलकजगंज देरवा चौक , सरकारी दवाखान्यामागे गोरखपुर) येथे असल्याचे तिने सांगीतले.
संबंधीत व्याक्ती हा तुझ्या वडीलांकडे सोडतो असे सांगुन त्यांने मला भुसावळ येथुन रेल्वेने येथे आणल्याचे तिने सांगीतले. या सर्व घटनेची माहीती तिने आजोबास सांगीतल्याने अखेर त्यांनी यावल पोलीस स्टेशनमध्ये आपली नातचे अपहरण झाल्याची तक्रार दिली आहे. या अनुषंगाने पोलीसांनी गुन्हा दाखल करून या घटनेची गांभीर्याने दखल घेत , पोलीसांचे पथक मुलीने सांगीतलेल्या ठीकाणी तिच्या शोध कार्यासाठी पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणी सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांचे दोन सदस्यीय पथक उत्तर प्रदेश येथे रवाना झाले आहे.