पाणी भरण्याच्या वादातून हल्ला

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डोणगाव येथे पाणी भरण्याच्या वादातून एकावर विळ्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.

डोणगाव येथील अनिल चुडामण पाटील यांच्यावर विळ्याने हल्ला करण्यात आला असून त्यांनी याबाबत यावल पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, त्यांच्या घराजवळ असलेल्या सार्वजनिक नळाला पाणी आले. घराशेजारील रहिवासी धनराज पाटील हे विजेची मोटार लावून पाणी भरत होते. बराच वेळ झाला तरी ते पाणी भरत असल्याने त्यांनी धनराज पाटलांना याबाबत विचारणा केली. त्याचा राग येऊन धनराज पाटील यांनी अनिल पाटील यास शिवीगाळ केली. भांडण सुरू असताना त्याचा मुलगा विशाल पाटील याने घरातून विळा आणून अनिल पाटील यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डाव्या हातावर तसेच डाव्या डोळ्याच्या खाली जखमा झाल्या.

या अनुषंगाने अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून धनराज शेनपडू पाटील, विशाल धनराज पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: