फसवणुक प्रकरणातील आरोपीला अटक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील व्यापार्‍याची खोटा धनादेश देऊन फसवणूक करणार्‍या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती अनुसार किनगाव येथील भुषण नंदन पाटील ( वय ३३ वर्ष ) यांचे राधाकृष्ण ट्रेडींगचे दुकान आहे. दिनांक १७ / ६ / २०२३ते दिनांक २२ / ६ / २०२३च्या दरम्यान दुपारी ४ वाजेच्या सुमारास किनगाव बु॥ गावात संशयीत आरीफ खान ईसा खान ( राहणार विवरे तालुका रावेर ) आणी फोनवर आदीवासी शाळेतील शिक्षक म्हणुन बोलणार्‍या व्यक्तिच्या दिलेल्या धनादेशवर विश्वास ठेवुन ९१ हजार रूपये किमतीची आसारी , ६५ हजार रुपये किमतीचे ३०पत्रे , ५० सिमेंटच्या गोण्या , ६१हजार रूपये किमतीची आसारी यांच्यासह बांधकामास लागणारे सुमारे २ लाख२५हजार रुपये किमतीचे साहीत्य सामान दिला.

यानंतर संशयीत आरोपी यांनी भुषण पाटील यांची फसवणुक केल्याचे निर्दशनास आल्याने त्यांनी यावल पोलीस ठाण्यात विश्वास संपादीत करून संबधीत बांधकाम साहीत्य खरेदी करणार्‍यांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या अनुषंगाने संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे . पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नरेन्द्र बागुले हे करीत आहेत.

Protected Content