बारावीच्या परीक्षेत यावल येथील दोन शाळांचा १०० टक्के निकाल

yawal 2

यावल (प्रतिनिधी)। येथील डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयातून यासर मोहंमद ताहीर कुरेशी ८६.४६ टक्के गुण मिळवून प्रथम आला. तर अलमस अन्जुम अय्यूब खान ८२.६१ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर फरहतजहाँ इब्राहीम खान ८२ टक्के गुण मिळून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

कला शाखेचा १००टक्के निकाल
यात अश्विनी मंदवाडे ७०.३ टक्के गुण मिळवून अश्विनी मंदवाडे शाळेतून प्रथम आली, तर रेवती भोईटे व कामिल तडवी या दोघांनी ७०.१ टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक पटकावला. तर दानिश बागवान याने ६९.०७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

यावल महाविद्यालय
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेचा ९८.३६ टक्के निकाल लागला असून यात ऋतुजा प्रशांत भोईटे ८० टक्के गुण मिळवून प्रथम आली . दामिनी तायडे ७८.९२टक्के गुण मिळून द्वितीय, तर स्नेहल इंगळे ७७.६९टके गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. कला शाखेचा निकाल ७५ टक्के लागला असून यात गणेश सपकाळे ७० टक्के गुण मिळवून प्रथम आला. पूजा मोरे ६९.६९ टक्के गुण मिळवून दितीय आली. पंकज पाटील ६८.६१टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. किमान कौशल्य विभागाचा निकाल ८५ टक्के लागला यात पूजा गुंजाळ ७५.३८ टक्के गुण मिळवून प्रथम आली. पालिका संचलित साने गुरुजी उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेचा निकाल १००टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९६टक्के ,तर कला शाखेचा निकाल ८२टक्के लागला.

Add Comment

Protected Content