कोटेचा महिला महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ कविसंमेलनाने साजरा.

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ येथील कोटेचा महिला महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘निमित्ताने आभासी कविसंमेलन संपन्न झाले.

कोटेचा महिला महाविद्यालयात ‘मराठी विभागा’च्या वतीने १४ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा केला जात आहे. आज शनिवार, दि. १५ जानेवारी २०२२ रोजी या महोत्सवाचे उद्घाटन प्राध्यापक डॉ.सत्यजित साळवे यांनी केले.

या आभासी कविसंमेलनामध्ये आमंत्रित कवी म्हणून प्रा.गणेश सूर्यवंशी, डॉ.रणजीत पारधे, प्रा मोरेश्वर सोनार, विनोद कुलकर्णी आणि कमलेश महाले यांनी समाजात घडत असलेल्या वास्तवावर प्रकाश टाकत आपल्या दर्जेदार कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.डी. देसले होते. कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रा.डॉ.सत्यजित साळवे यांनी भूषवले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात ‘मुली’ ही भावूक करणारी संवेदनशील कविता सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मनीषा इंगळे, प्रास्ताविक प्रा.सचिन पंडित आणि मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.विनोद भालेराव यांनी आमंत्रित कवींचा परिचय व आभार प्रदर्शन केले. या कविसंमेलनात प्राध्यापक आणि विद्यार्थिनींनी ऑनलाइन उपस्थिती दर्शविली.

Protected Content