यावल तालुका पो.पा. संघ अध्यक्षपदी पवन चौधरी तर उपाध्यक्षपदी प्रसन्न पाटील

po.pa .sangh yawal

यावल, प्रतिनिधी | येथील पोलीस पाटील संघटनेचे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली येथील खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात आज (दि.१) सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची वार्षीक सर्वसाधारण बैठक होवून या बैठकीत या वर्षासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

यात संघाच्या अध्यक्षपदी पवन हेमंत चौधरी, उपाध्यक्ष प्रसन्नकुमार चंद्रकांत पाटील, सचिव सुरेश वामन खैरनार, कार्याध्यक्ष चंद्रकांत देवीदास पाटील, संघटक भरत रघुनाथ पाटील, प्रसिद्धीप्रमुख किरण भास्कर कचरे, महिला संघटक सरिता रमजान तडवी, सदस्य युवराजसिंग पाटील, विठ्ठल दगडू कोळी, समाधान रवींद्र अडकमोल, दीपक नारायण पाटील, महेमुद फत्‍तु तडवी, नरेश बाबुराव मासुळे, ज्ञानदेव चौधरी, रेखा दिनकर सोनवणे, प्रफुल्ल गोटूलाल चौधरी, मार्गदर्शक व सल्लागार म्हणून चंद्रकांत इंगळे, मनोज देशमुख, कैलास सोळुंके व गजानन चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी सदर कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यासाठी गणेश पाटील, अशोक पाटील, किरण पाटील, मकबुल तडवी यांच्यासह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बांधवांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. यावेळी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content